बस-कंटेनरची धडक; टाटा, जसलोकचे 40 डॉक्टर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

मुंबईहून संभाजीनगरकडे कॉन्फरन्ससाठी मुंबईतील टाटा व जसलोक रुग्णालयांच्या 40 डॉक्टरांच्या टीमला घेऊन जाणारी खासगी लक्झरी बस व कंटेनर यांच्यात टक्कर  होऊन बसचालक जागीच ठार झाला. क्लीनरसह 40 डॉक्टर जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव बायपासजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

डॉ. अनिल टिबलेलवाल, डॉ. पुष्कर इंगळे व डॉ. जॉनी कार्लटन अशी तिघा गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातात  दीपांजली अडुलकर, भावीन विसारिया, आशीष भांगे, स्वाती चूग, हर्षिता, प्रीती, मनीष मदाने, असपिया खान, त्रिरंजन बासू, दीपककुमार, जाहिद मुलाणी, सायोग डे, सचिता पाल, आकांक्षा अनुप, जीन्स मॅथ्यू, निष्ठा सेहरा, प्रशांत नायक, पल्लवी खुरुड, जिमी मंजरी, प्राची सावंत, अजय शशीधरण, अनुजकुमार, समर्पिता मोहंती, प्रारब्ध सिंग, अमरेंद्र कुमार, सुचिता पॉल, वेदांत मूर्ती, सागर गायकवाड, केतकी अडसूळ, उन्मेष मुखर्जी, कस्तुरी बर्वा, उपासना सक्सेना, सचिन आनंद, जिम्पी जोष, निशिता सेहरा, रवि शंकरदास हे डॉक्टरही जखमी झाले आहेत. मृत चालक व जखमी डॉक्टर मुंबईचे रहिवासी असून ते टाटा-जसलोक हॉस्पिटलमध्ये सेवेत आहेत. कोतवाली पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले आहे. एका वैद्यकीय परिषदेसाठी जात असताना केडगाव बायपासवर  हा अपघात घडला.