
नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या परीक्षा घेण्यात झालेला गोंधळ हा संबंधित मंडळे आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अकार्यक्षमतेचा पुरावा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळामुळे केवळ परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झालेला नाही, तर हिंदुस्थानातील मेहनती आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या जागतिक प्रतिमेलाही धक्का बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेवर आणि त्यांच्या भविष्यावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि सीबीएसई मंडळातील सदस्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. “या सर्वांना जबाबदार धरून कारवाई केल्याशिवाय लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही,” असे त्यांनी म्हटले.
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात तसेच सीबीएसईच्या ओएसएम अंमलबजावणीतील कथित त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचीही त्यांनी मागणी केली. दोषींवर कडक कारवाई न करता २०४७ च्या ‘विकसित हिंदुस्थान’चे स्वप्न दाखविण्यात अर्थ नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिक्षण व्यवस्थेतील चुका दुरुस्त करून त्यात मूलभूत सुधारणा केल्याशिवाय भविष्यात चांगल्या परिणामांची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल, असेही ठाकरे यांनी म्हटले. शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराला देशातील सर्वांत कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण हा प्रकार थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफ करता कामा नये. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
The absolute mess in the NEET and CBSE examinations not only shows the absolute inefficiency of those on the boards and the HRD ministry to conduct these exams, but also damages the global repute, trust and employability of India’s talented hardworking youth.
Without sacking the…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्यासह संपूर्ण सीबीएसई मंडळाला पदावरून हटवा
CBSE ने शाळांना ऑन-स्क्रीन मार्किंग’ प्रणालीला पाठिंबा देत सोशल मीडियावर रील्स बनवण्याचे पत्र दिले आहे. याची एक बातमी शेअर करून आदित्य ठाकरे म्हणाले की, “अशा प्रकारच्या गोंधळानंतर जगातील कोणते विद्यापीठ आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहील?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह संपूर्ण सीबीएसई मंडळाला पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षण क्षेत्रातील अशा उघड भ्रष्टाचाराला देशातील सर्वांत कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Which global university is going to take our education seriously after such nautanki of reels?
The HRD Minister Pradhan must be sacked, along with the entire CBSE board.
Such blatant corruption in education must be punished with highest punishment in the land! They’re messing… https://t.co/BMN0gst8ut
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2026






























































