
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना आज सक्तवसूली संचलनालयासमोर चौकशीसाठी हजर रहावे लागले. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
”या देशात जो कोणी सत्यासोबत उभं राहिला असेल किंवा ज्याने सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असेल त्याच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा लावला जातो. हा पॅटर्न देशभरात सर्वत्र सुरू आहे. कुठेही सध्या देशात लोकशाही दिसत नाही’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
नागपूर येथील अजनी रेल्वे स्टेशन विकासासाठी तेथील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून आरेप्रमाणेच येथेही मनमानी पद्धतीने पर्यावरणावर घाला घातला जात आहे. या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनच्या सदस्यांशी तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन या प्रकरणात सर्वतोपरी… pic.twitter.com/yoKGokni0Q
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 22, 2023
आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. अजनी रेल्वे स्टेशन विकासासाठी तेथील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनच्या सदस्यांशी तसेच स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच नांदगाव येथील प्रदुषणाबाबतही त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
नांदगाव येथील ग्रामस्थांसमोर आता पुन्हा राखेच्या प्रदूषणाचा प्रश्न उभा राहिला आहे. मविआ सरकार असताना अॅश पॉंडची समस्या दूर करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा येथे अॅश पॉंड येण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येथील स्थानिकांशी संवाद साधला. या प्रदूषणकारी अॅश पॉंडला आपण विरोध… pic.twitter.com/fwHSSTF4rv
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 22, 2023






























































