जनता पर्यावरणासाठी लढा देतेय आणि हे सरकार त्यांच्या विरोधात आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जैवविविधता दिवसावरून राज्यातील घटनाबाह्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात सरकार कोण कोणत्या ठिकाणी दडपशाहीचा वापर करून जनतेच्या विरोधात जात प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करतेय त्याची यादीच सादर केली आहे.


”जैवविविधता दिनाविषयी जग ट्विट करत असताना आणि आपले बेकायदेशीर सरकार फोटोसाठी समुद्रकिनारी साफसफाई करत आहे. मात्र सत्य हे आहे की खालील ठिकाणी नागरिक पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी लढा देत आहेत आणि राज्य शासन नागरिकांच्या विरोधात आहे. 1) पुणे रिव्हरफ्रंट विकास 2) वेताळ टेकडी, पुणे 3) आरे जंगल – पुणे 4) अजनी वन – नागपूर, 5) नांदगाव – नागपूर, 6) रिफायनरी – रत्नागिरी.” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.