काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं कितपत योग्य? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुख्यमंत्री होणार कोण हे कुठे ठरलं आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं कितपत योग्य? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री होणार कोण हे कुठे ठरलं आहे. दुसरी गंमत अशी की एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी हे ट्विट केले आहे. हा आधिकार राज्यपालांचा आहे. हे कधीपासून राज्यपाल झाले? आपला देश ट्विटरवर कधीपासून चालायला लागला? शपथविधीची तारीख राज्यपाल कार्यालयाने सांगायला पाहिजे होती. सरकार स्थापन करण्याचा दावा अद्याप केलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं कितपत योग्य आहे, राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं. काही दिवसांची सुट्टी घेणं का गरजेचं आहे, कोणीच भेटू शकत नाही तिथे जायचं म्हणजे हेलिकॉप्टर लागतं आणि सर्वसामान्यांकडे हेलिकॉप्टर नाहिये. कुठली शेती आहे जी प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करावी लागते? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.