
आजरा तालुक्यातील पोळगाव व एरंडोळ येथे गेल्या तीन दिवसांपासून हत्तीने धुमाकूळ घातला आहे. हत्तीने संभाजी बाळू नार्वेकर या शेतकऱ्याच्या घराजवळ उभा केलेल्या
ट्रक्टर ट्रॉलीला धडक देऊन ती पलटी केली, तर जवळच उभ्या असणाऱया जेसीबीला धडक देऊन काचा फोडल्या. हत्तीच्या धुमाकुळामध्ये पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेले तीन दिवस हत्तीचा या भागातील शेती पिकामध्ये धुमाकूळ चालू आहे. येथील राजू होलम, दशरथ होलम यांच्या गटनंबर 118 मधील ऊसपिकाचे हत्तींनी मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर भीमराव विठोबा चौगुले यांच्या उसाचेही नुकसान केले आहे.
बळीराजा खरिपाच्या तयारीत असतानाच हत्तीने धुमाकूळ घातल्याने श्sातकऱयांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी शेतीकामासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गडहिंग्लज उपविभागातील आजरा चंदगड तालुक्यात हत्तींच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत.



























































