केजरीवालांनी लिहून दिले… गुजरातच्या जनतेची भाजपच्या तावडीतून सुटका होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये भाजप हरणार आणि ‘आप’ जिंकणार, असा दावा करून केजरीवाल थांबले नाहीत. त्यांनी कोरा कागद घेतला आणि पत्रकारांसमक्षच गुजरातमध्ये आपचे सरकार येणार असे लिहून दिले. त्याखाली स्वतःची स्वाक्षरीही त्यांनी केली.

गुजरातच्या रणमैदानात आम आदमी पक्षाने भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले असून आता तर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या निकालाची भविष्यवाणीच केली आहे. गेली 27 वर्षे गुजरातमध्ये भाजपचे कुशासन असून या कुशासनाच्या तावडीतून या वेळी गुजरातच्या जनतेची सुटका होणार आहे, असे केजरीवाल म्हणाले. गुजरातमध्ये आपचे सरकार येणार, असे केजरीवाल यांनी भरपत्रकार परिषदेत कोऱ्या कागदावर लिहून दिले.

 गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार असून प्रचाराचे रण सध्या चांगलेच तापले आहे. अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज सूरत येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपवर तोफ डागली आणि गुजरातमध्ये आपचेच सरकार येणार असा दावा करत पुन्हा एकदा भविष्यवाणी केली. माझी राजकीय भविष्यवाणी खरी ठरते, असे नमूद करत त्यांनी कोऱ्या कागदावर गुजरातचे निकाल काय असतील हे लिहून दिले.

गुजरातच्या जनतेच्या मनात भाजपने दहशत बसवली आहे. त्यामुळे उघडपणे आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायला ते कचरत असले तरी मनातून मतदार आमच्यासोबत आहेत आणि ते मतदानातून आपला काwल स्पष्ट करतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.

माझी भविष्यवाणी खरी ठरते…

1 दिल्ली निवडणुकीवेळी 2014 मध्ये काँग्रेसला शून्य जागा मिळणार असे मी लिहून दिले होते. त्यावर कुणी विश्वास ठेवला नाही, पण निकाल तसेच लागले.

2 पंजाब निवडणुकीवेळी मी नवज्योतसिंग सिद्धू हरतील, चरणजीतसिंग चन्नी दोन्ही जागा जिंकणार नाहीत, बादल कुटुंब हरणार, असे सांगितले आणि ते खरे ठरले.