समोर आली आयेशा आरिफ खानची सुसाईड नोट, आरिफच्या अत्याचारांचा वाचला पाढा

अहमदाबादच्या आयेशा आरिफ खान हिने पती व सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तिचा आत्महत्येपूर्वीचा साबरमती रिव्हरफ्रंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून आयेशाने तिचे व्यक्त केलेले दुख ऐकून पूर्ण देश हादरला.

तिचे आई वडिलांसोबतचे शेवटचे संभाषण देखील समोर आले. त्यानंतर आयेशाचा पती आरिफ खान याला पोलिसांनी अटक केली. आयेशाच्या आत्महत्येच्या आठवड्याभरानंतर आयेशाची सुसाईड नोट समोर आली आहे. या सुसाई़ड नोटमधून आयेशाने तिच्यावर होणाऱ्या अनन्वित अत्याचारांबाबत सांगतिले आहे.

‘आरिफ माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं पण तु मला सतत ऊास द्यायचास. मी गरोदर असताना तु मला 4 दिवस एका खोलीत डांबून ठेवलं होतस. अन्नपाण्याविना मी तिथे राहिले. तु माझी काहीच मदत नाही केलीस. मी गरोदर असताना तु मला मारहाणही केलीस. त्यामुळे मी आपलं बाळ गमावलं. माझा लिटील आरू गेला. आता मी देखील त्याच्याकडेच जातेय’ असे आयेशाने लिहले आहे.

आरिफ याने अटकेनंतर आयेशावर काही गंभीर आरोप केले होते. त्यात तिचे दुसऱ्या कुणासोबत अफेयर असल्याचेही म्हटलेले. दरम्यान या पत्रात आयेशाने तिच्यावरील या आरोपांबाबतही सांगितले आहे. ‘माझे फक्त तुझ्यावरच प्रेम होते. पण तु मला त्रास देण्यासाठी माझे नाव आसिफ सोबत जोडलेस. तु तुझा बाहेरख्याली पणा लपविण्यासाठी मला बदनाम करत होतास. आसिफ तर माझा सर्वात चांगला मित्र व भाऊ होता. मी कधीच तुला धोका दिलेला नाही. पण तू तुझ्या स्वार्थासाठी माझं आयुष्य खराब केलस. आय लव्ह यू आरिफ. मी चुकीची नव्हती. तर तुझा स्वभाव चुकीचा होता. मी तुझ्या डोळ्यांवर फिदा होती. पण मी तुझ्यावर इतकं का प्रेम केलं ते आता पुढच्या जन्मी सांगेन. लव्ह यू फॉरएव्हर. तुझी बायको आयशा आरिफ’ असे तिने पत्रात लिहले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या