जवानाच्या अपहरणाची बातमी खोटी, संरक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरात बडगाम जिल्ह्यात एका जवानाचे अपहरण करण्यात आल्याची बातमी शुक्रवारी आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने दिलं आहे. हा जवान सुरक्षित असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

शुक्रवारी जम्मू-कश्मीर लाईट इन्फंट्रीचे जवान मोहम्मद यासिन भट यांचे त्यांच्या घरातून अपहरण झाल्याची बातमी आली होती. या बातमीनुसार, भट हे सुट्टीवर बडगाम जिल्ह्यातील काझीपोरा येथे आपल्या घरी आले होते. शुक्रवारी रात्री अज्ञात बंदुकधारी घरामध्ये घुसले आणि जवान यासिन भट यांना घेऊन गेले, अशी माहिती भट यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. यासंदर्भात कुटुंबीयांनी तातडीने सुरक्षादलांशी संपर्क साधला. लष्करी जवान आणि पोलिसांनी काझीपोरा परिसर आणि बडगाम जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.

मात्र, आता ही बातमी खोटी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. भट हे सुरक्षित असल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.