
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात नवीन बदल होताना दिसत आहेत. चित्रपट, नाटक, मालिका यांपेक्षा वेगळा पर्याय ओटीटी मनोरंजनामुळे प्रेक्षकांना मिळाला आहे. या क्षेत्रात नवीन धाडसी प्रयोगही तितकेच होताना दिसतात. अशाच एका धाडसी प्रयोगाविषयी अभिनेत्रीने उलगडा केला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. इन्स्टाग्रामवर आपल्या बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घालणाऱ्या नियाच्या एका लेस्बियन किसची चर्चा सध्या होत आहे. ट्विस्टेड नावाच्या या वेबसीरिजमध्ये नियाने ईशा शर्मा नावाच्या अभिनेत्रीसोबत हा सीन दिला आहे.
या सीनवरून आणि एकंदरच या वेबसीरिजच्या अनुभवावर विचारलेल्या प्रश्नांना नियाने उत्तर दिली आहेत. या सीनमुळे आपल्या वेबसीरिजला फायदा झाल्याचं तिने म्हटलं आहे. या सीनच्या चित्रीकरणावेळी मनात आलेल्या अनेक शंकाकुशंका तिने बोलून दाखवल्या.
ती म्हणाली की, कथेच्या वेगळेपणामुळे मी ही सीरिज स्वीकारली. पण, हे दृश्य चित्रीत करताना मला भयंकर अस्वस्थ वाटत होतं. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आता वाटतं की पुरुषासोबत असा सीन देणं जास्त सोपं आहे. पुन्हा जर असा सीन असेल तर मी हो म्हणेन अशी शक्यता कमी आहे, असंही निया या वेळी म्हणाली.




























































