
सामना ऑनलाईन । मुंबई
उपनगरातील वीज व्यवसाय विक्रीबाबत वर्षभरापासून सुरू असलेला रिलायन्स एनर्जी आणि आदानी यांच्यातील व्यवहार आज पूर्ण झाला. आदानी ग्रुपने ‘आदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’ या नावाने रिलायन्सचा वीज व्यवसाय तब्बल 18 हजार 800 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे आदानी इलेक्ट्रिसिटीची वीज बिले येणार आहेत. रिलायन्स एनर्जी आतापर्यंत उपनगरातील 400 चौरस किलोमीटर क्षेत्रातील 30 लाख ग्राहकांना वीज पुरवठा करत होते, मात्र हा सर्व व्यवसाय आदानीला विकला असून त्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. यापुढे उपनगरातील वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे आदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे सीईओ अनिल सारदाना यांनी स्पष्ट केले आहे.



























































