शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये सहसचिवपदी मोसिन शेख, हर्षद कारकर, समृद्ध शिर्पे, अभय चव्हाण, विराज बनसोड, पंकज गोरे, जसप्रितसिंग वडेरा, प्रथमेश बोभाटे, विशाल सातव, रॉनक देसाई, विक्रम अनिल राठोड, विशाल केचे, सिद्धेश पाटेकर, करण मढवी, भूमिष सावे, मुकेश कोळी, प्रदुमन माने, जयसिंग राजे भोसले, नितीन गोरे, हुसेन मन्सुरी, सोहम हल्लाळीकर, विशाल कपाडिया, दुर्गेश वैद्य, भूषण शिरसाट, अजित गावडे, अजय जठार, सागर सावंत, राजवी लाड, डॉ. शरिवा रणदिवे, अॅड. उषा पवार, पूजा खंदारे, रेणुका साबळे, प्रांजल महाडेश्वर, रोहिणी पाटील, मालती वळवी, काजल तांबे, रोशनी शिंदे, शेरोन सलोमोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवासेना पदाधिकारी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहीम विधानसभेच्या युवा सेना (युवती) विभाग युवती अधिकारीपदी अॅड. तेजस्वी गावडे-सुर्वे व कॉलेज कक्ष सक्रिय सदस्यपदी अविष्कार शिंगाडे यांची नियुक्ती केली आहे.
उपसचिव पदाच्या नियुक्त्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना उपसचिव पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये उपसचिवपदी अमित पेडणेकर, मनीषा वाघमारे आणि दीपक बोचरे यांची नियुक्ती केली आहे.