
दिवाळी म्हटलं की किल्ला बांधणी आलीच. घरोघरी, सोसायटी, चाळींमध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याची लगबग सुरू होते. याच किल्ला बांधणीचा आनंद शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही लुटला. ‘मातोश्री’ निवासस्थानी आदित्य ठाकरे लहान मुलांसोबत किल्ला बांधणीच्या कामात सहभागी झाले.
स्वराज्याचे प्रतीक म्हणून दिवाळीत किल्ल्यांची प्रतिकृती उभारून महाराष्ट्राचा इतिहास जागवला जातो. महाराष्ट्राच्या तरुणाईला ह्याच किल्ल्यांकडून निधड्या छातीने लढत राहण्याची प्रेरणा मिळते. किल्ला बांधत असताना पुन्हा एकदा बालपण जगण्याची संधी मिळतेच, पण मराठमोळ्या स्वराज्याचे पाईक असण्याची जाणीवसुद्धा बाळगोपाळांच्या मनात निर्माण होते. आज मातोश्री येथे लहान मुलांसोबत त्यांच्या किल्ला बांधणीच्या कामात सहभागी झालो आणि पुन्हा बालपण मनात जागं झालं, अशी प्रतिक्रिया किल्ला बांधणीच्या कामात सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त ‘मातोश्री’ या निवासस्थानी लहान मुलांसोबत मातीचा किल्ला उभारला. किल्ला बनवताना ते चिमुकल्यांसह रमलेले पहायला मिळाले. अत्यंत रेखीव असा किल्ला या सर्वांनी मिळून साकारला. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
View this post on Instagram































































