अझान सुरू झाली म्हणून आदित्य ठाकरेंनी थांबवले भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शिवसेना कधीच कुणाच्या धर्माच्या विरोधात नसून प्रत्येक धर्माचा आदर हा शिवसेनेने राखला आहे. याचीच प्रचिती बुलढाण्यातील शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेत आली. आदित्य ठाकरे यांच्या सभेत खासदार प्रताप जाधव भाषण करत असताना जवळच्या मशिदीतून अझान सुरू झाली. आदित्य ठाकरे यांनी खासदार जाधव यांचे भाषण थांबवून अझान संपन्न होईपर्यंत शांतता राखली.

रावणरुपी दुष्काळाविरोधात एकत्र येऊन लढा देऊ, आदित्य ठाकरेंचा निर्धार

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर येथे आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबीयांना मदत वाटप आणि जाहीर सभा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी खासदार प्रतापराव जाधव प्रास्ताविक करीत होते. खासदार यांचे भाषण सुरू असताना अचानक अझान सुरू झाली. खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रास्ताविक भाषण सुरूच होते. एकीकडे अझान आणि दुसरीकडे भाषण असे चित्र असताना मात्र त्या वेळी आदित्य ठाकरे यांनी प्रतापराव जाधव यांना भाषण थांबवण्याची विनंती केली. अझान संपेपर्यंत सभेत शांतता पाळण्यात आली. अझान संपल्यावर प्रतापराव जाधव यांचे भाषण पुन्हा सुरू झाले.