25 टक्के कोटा प्रवेश, ऑनलाइन अर्जाची मुदत 30 मार्चपर्यंत वाढविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. 5 मार्चपासून https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला 22 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती पण यात आता वाढ करण्यात आली आहे.

दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. पालकांपर्यंत या प्रवेशप्रक्रियेविषयी माहितीच न पोहोचल्याने अनेक विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहत आहेत. गेल्या वर्षी मुंबई विभागात 25 टक्के प्रवेशाच्या 8 हजार 374 जागा होत्या यांपैकी केवळ 3 हजार 233 जागा भरण्यात आल्या. याची दखल घेत युवासेना आणि भारतीय शालेय पालक संघाच्या वतीने 25 टक्के प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास पालकांना मार्गदर्शन करण्यात येत असून शिवसेना शाखांमधून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत.

आतापर्यत आलेले ऑनलाईन अर्ज
राज्यभरातून आतापर्यंत 25 टक्के कोटा प्रवेशासाठी एकूण 2 लाख 13 हजार 199 विद्यार्थ्यांच अर्ज आले आहेत. z मुंबई विभागातून अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 10 हजार 370 एवढी आहे. तर ठाणे आणि पालघर जिह्यातून 14 हजार 126 आणि 1 हजार 92 एवढी आहे.
25 टक्के कोटय़ाच्या उपलब्ध जागा
मुंबई – एकूण शाळा – 356, जागा – 7,560
ठाणे – एकूण शाळा – 652, जागा – 13, 400
पालघर – एकूण शाळा – 222, जागा – 4,252

25 टक्के कोटय़ातून पहिल्या इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट 6 ते 7 वर्षे, दोन महिने आणि 29 दिवस अशी आहे.