शिवसेनेच्या धरणे आंदोलनामुळे नगर पंचायत प्रशासनाचे पलायन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुरबाड

ठाणे जिल्ह्यात नव्यानेच निर्माण झालेल्या मुरबाड नगर पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेनेने ठाणे जिल्हाप्रमुख तथा हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड नगर पंचायत समोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामुळे नगर पंचायत प्रशासन हादरून गेले. या आंदोलनात बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, जिल्हा परिषद सभापती बाळ्यामामा म्हात्रे, प्रभुदास नाईक, युवासेना शहरधिकारी बाळा कांबरी जि.प.सदस्य रेखाताई कंटे, प.स.सदस्य प्रगती गायकर, तालुका प्रमुख कांतीलाल कंटे व शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

नगर पंचायत समोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयाचा घोटळा उघड होईल या भितीने मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे, कार्यालयीन अधिक्षक संदिप कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रशिक्षणाचे निमित्त करुन कार्यालयाबाहेर पळ काढून आंदोलनकर्त्यांच्या समोर जाण्याचे टाळल्याने तमाम आंदोलनकर्त्यांमध्ये उद्रेक निर्माण झाला. त्यावेळी नगर पंचायतीने केलेल्या बोगस कामांचा व भ्रष्टाचाराचा पाढाच शहर अध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी सादर केल्याने जोपर्यंत जबाबदार अधिकारी निवेदन स्वीकारण्यास येत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतल्याने मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन निवेदन स्विकारले व नगरपंचायतीचे प्रशासकीय आधिकारी गायब का झालेत याची चौकशी करण्याची विनंती वरीष्ठांकडे करू, असे अश्वासन दिले.