शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही! खरिपाच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिली कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अतिवृष्टी किंवा सततचा सत्ता पाऊस झाला सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असं सांगितलं होतं, पण अद्यापही भरपाई सुद्धा मिळाली नाही, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला सत्ताधारी गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दुजोरा देत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचा रोष वाढलेला आहे. तो पावलोपावली आता दिसून येत आहे, अशी जाहीर कबुली यावेळी दिली. तसेच, शेततळ्याचा कागदावरून सुद्धा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शनिवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खरीप आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकसान भरपाईची रक्कम कशा पद्धतीने येईल त्याची दखल प्रशासनाने घ्यावी, राज्यात खरिपाचा आढावा बैठक होत आहे. शेतकऱ्यांना कोणताही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी, शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करावा असे विखे यांनी सांगितले. तसेच, जे कोणी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना लिंकिंग करतील, अशांच्या संदर्भात कठोर कारवाई करावी. जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर जे क्षेत्रीय अधिकारी नियोजन करत आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी असेही त्यांनी आदेश यावेळी दिले.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार लहू कानडे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धारामू सालीमठ, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आमदार लहू कानडे यांनी ‘श्रीरामपूरमध्ये अतिवृष्टी व अन्य ठिकाणी सततचा पाऊस झाला व त्याची मागील वर्षाची अद्यापही भरपाई मिळाली नाही. आम्हाला शेतकरी सातत्याने मागणी करत आहे त्याचे काय झाले’ असा सवाल उपस्थित केला. याच वेळेला सत्ताधारी गटातील खासदार लोखंडे यांनी सुद्धा यांच्या म्हणणे बरोबर असून अद्यापपर्यंत नेवासा अथवा इतर तालुक्यात सुद्धा अशी पद्धतीची मदत मिळाली नाही, हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. मदत न मिळाल्यामुळे आता शेतकऱ्यांचा रोष हा वाढत चाललेला आहे, अशी जाहीर कबुली सुद्धा त्यांनी दिली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नगर जिल्ह्यासाठी 166 कोटी रुपयांचे अनुदान आलेले आहे, उर्वरित अनुदान येणे बाकी आहे. आम्ही सर्व अहवाल पाठवलेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यावर पालकमंत्री विखे यांनी निधी लवकरात लवकर येण्यासाठी आपण पाठपुरावा करा अशा प्रकारचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
मागेल त्याला शेततळे द्या, असे सरकारी जाहीर केले, पण अद्यापपर्यंत 7000 शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यामध्ये कागदाचे अनुदानच मिळाले नाही, असा मुद्दा लोखंडे व कानडे यांनी उपस्थित केला. यावेळी कृषी विभागाने आम्ही नियोजन करून यादीनुसार आम्ही अनुदान देत आहोत, असे सांगितले. मात्र दुसरीकडे आम्हाला केव्हा याची मदत मिळणार हे जाहीर सांगा असे सांगितले. त्यावर पालकमंत्री विखें यांनी राज्यस्तरावर या संदर्भातील चर्चा झालेली आहे लवकरात लवकर सर्व कागद उपलब्ध होऊन त्याचे अनुदान मिळेल असे सांगितले.
खताच्या व बियाण्यांच्या संदर्भामध्ये कृषी विभागाने माहिती सादर केल्यानंतर पालकमंत्री विखे यांनी आपण योग्य पद्धतीने नियोजन केलेले आहे पण दुसरीकडे कोणत्याही प्रकारे खतांचे लिंकिंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी तालुकास्तरावर जी काही तुम्ही कमिटी नेमा तसेच जिल्हा प्रशासनाने जर एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली तर त्या शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही, तसे होता कामा नये यासाठी एक आढावा बैठक येथे एक दोन दिवसात घ्या व एक टोल फ्री क्रमांक जाहीर करा जर शेतकऱ्याची तक्रार घेतली नाही किंवा त्याला कोणी मदत केली नाही तर संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल असेही विषय यांनी यावेळी स्पष्ट केले.