
नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर स्टाफ नर्स अस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती जाहिर केली आहे.
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त
2/2— Rajesh Tope (@rajeshtope11) November 8, 2021






























































