दोन महिन्यात तिसरी लाट! एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनाची दुसऱ्य़ा लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र अद्यापही रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण चिंताजनकच आहे. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी तिसऱ्य़ा लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. कोरोनाच्या तिसऱ्य़ा लाटेवर भारतीय आयुर्विज्ञान संस्थान  (एम्सच) डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर कोरोना नियमावलींचे पालन केले नाही, तर कोरोनाची तिसरी लाट दोन महिन्यात येऊ शकते. गुलेरिया यांच्या इशाऱ्य़ाने गांभीर्याने घेणे, आवश्यक आहे.

एम्सचे संचालक डॉ. गुलेरियाने म्हटले की, आतापर्यंच्या रिसर्चमध्ये असे कोणतेही पुरावे मिळालेले नाही की, कोरोनाची तिसरी लाट प्रौढांपेक्षा लहान मुलांना प्रभावित करेल. यापूर्वी हिंदुस्थानच्या महामारी विशेषज्ञांनी पहिल्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. देशात एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यावधीत कोरोनाची दुसरी लाट हिंदुस्थानात पीकवर पोहोचली होती. या दरम्यान देशात कोरोनामुळे होणाऱ्य़ा मृत्यूंमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली होती. जास्तीत जास्त राज्यांमध्ये या काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे केस कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

तिसरी लाट रोखण्याचे 4 उपाय

  • हिंदुस्थानात जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल.
  • लोकांना कोविड गाइडलाइन्सचे पालन करावे लागेल.
  • अशा परीसरांची मॉनिटरिंग करावे लागेल, जेथे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
  • जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 5टक्यांपेक्षा जास्त आहे, तेथे कंटेनमेंट क्षेत्र घोषित करावे लागेल.
  • महाराष्ट्रात 2 ते 3 आठवड्यांच्या आत तिसरी लाट येण्याचा अंदाज

महाराष्ट्रात महिनाभरात तिसरी लाट!

महाराष्ट्रात 1 महिन्यांच्या आत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट डेल्टा प्लसमुळे येईल. राज्याच्या कोविड टास्क फोर्सने या महामारीच्या आढावा बैठकीमध्ये ही माहिती दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेडिकल टीम आणि इतर अधिकाऱ्य़ांना आवश्यक उपकरणांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.