एअर इंडियाचे पहिले ए350, एअरबस विमान दाखल

एअर इंडियाचे पहिले एअरबस ए 350-900 विमान हिंदुस्थानात दाखल झाले आहे. एअर इंडियाने आज व्हीटी-जेआरए नोंदणीकृत 20 एअरबस ए 350-900 विमानांपैकी एक विमानाचे स्वागत केले. हे विमान फ्रान्सच्या टुलूज येथील एअरबस केंद्रातून शनिवारी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी दिल्लीत पोहोचले. हिंदुस्थानात पहिल्यांदा नवीन वाइड-बॉडी फ्लीट टाईपला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतले आहे. एअर इंडिया ए 30 उड्डाण करणारी पहिली हिंदुस्थानी एअरलाइन्स कंपनी बनली आहे.