हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवकाचा भाजपप्रवेश, शहरभर होर्डींग लावून जाहिरातबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले आणि एकदा तडीपार करण्यात आलेले  चंद्रपूरचे माजी नगरसेवक अजय सरकार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सरकार यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी आपले बॅनर उभारले आहे. असंख्य गंभीर गुन्ह्यांची नोद असलेल्या सरकार यांचे हे बॅनर पाहिल्यानंतर भाजपचे वॉशिंग मशिन चंद्रपुरात दाखल झालंय की काय अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये रंगायला लागली आहे. दंगल, शिवीगाळ, बळजबरी, हाफ मर्डर, खून असे गंभीर गुन्हे ज्याच्या नावावर आहेत अशा व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने पक्षातील निष्ठावंत आणि चारित्र्यवान कार्यकर्ते नाराज झाले आहेत.