
अभिनेता अजिंक्य देवची सध्या चौफेर वाटचाल सुरू आहे. त्याची भूमिका असलेला ‘झोलझाल’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे, तर शोमन सुभाष घई निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘माय डॅडस वेडिंग’ या मराठी चित्रपटातही अजिंक्यची महत्त्वाची भूमिका आहे. 17 जूनपासून या चित्रपटाचे लंडन येथे चित्रीकरण सुरू होत आहे. याशिवाय भाऊ अभिनय देवच्या दिग्दर्शनातील ‘ब्राऊन’ या वेब सीरिजमध्ये तो करिष्मा कपूरसोबत भूमिका साकारत आहे. त्याशिवाय बिजॉय नंबियार दिग्दर्शित ‘काला’ या वेब सीरिजमध्ये त्याने भूमिका साकारली आहे.




























































