अक्षय कुमार घेणार रामसेतुचा शोध, वाचा काय आहे बातमी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

आता पुन्हा एकदा अक्षय चर्चेत येण्याचं कारण राम सेतू आहे. कारण, अक्षय रामसेतुचा शोध घेणार आहे.

थांबा, हा शोध वास्तवातील नसून त्याच्या आगामी चित्रपटाचा विषय आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयने प्रेक्षक आणि त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे.

अक्षयने त्याच्या आगामी रामसेतू या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिवाळीच्या दिवशी त्याने आपल्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

रामसेतू – सत्य की कल्पना? अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे. पोस्टरवर संशोधकाच्या वेशभूषेतील अक्षय कुमार दिसत आहे. हा चित्रपट हिंदुस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमधील सामुद्रधुनीमध्ये दिसणाऱ्या पुलावर आणि त्याच्या शोधावर बेतली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158360465298283&id=20143593282