
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्री नाथषष्ठी निमित्त श्रींचे गाभाऱ्यात द्राक्षांची आरास लक्षवेधी करण्यात आली. यावेळी श्रींचे लशवेधी रुप भाविकांनी आपल्या नेतरांत साठवून ठेवत दर्शन घेतले.
आळंदी मंदिरात श्रींचा गाभारा वेगवेगळ्या दिन विशेषानुसार सजावट केली जाते. यासाठी श्रींचे भाविक श्रद्धापूर्वक सजावटीचे साहित्य,आकर्षक फुले तसेच फळे ठेवून सेवा रुजू करतात. यासाठी माऊली देवस्थान व भाविक या सेवकांच्या माध्यमातून सेवा रुजू होत असते. यासाठी मुकुंद कुलकर्णी अनेक महिन्यापासून
सजावटीचे काम सेवाभावी वृत्तीने करीत असतात. आळंदीतील युवक तरुण यासाठी सेवेचे कार्यात सहभागी आहेत. नाथषष्ठी निमित्त मुरलीधर घुंडरे यांनी सेवा रुजू केली.
यावेळी प्रसाद घुगे, सचिन वहिले, मुकुंद महाराज कुलकर्णी आदींनी सेवेट परिश्रम घेतले.नाथषष्ठी निमित्त आळंदी देवस्थान तर्फे पैठण ला श्रींची पूजा करण्यात आली.



























































