
सामना ऑनलाईन । मुंबई
एखाद्या तरुणीवर ऑसिड हल्ला होण्यामागे केवळ प्रेमप्रकरण हेच एकमेव कारण नसते, तर नोकरीधंद्यातील यशस्वी महिलांवरही अॅसिड हल्ला झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दुर्दैवाने अॅसिड हल्ला पूर्णपणे रोखणे हे आपल्या हातात नसले तरी आपण शक्य तितकी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सावधानता हाच अॅसिड अॅटॅकला प्रतिबंध ठरू शकतो, असे प्रतिपादन अभिनेत्री पूजा वेलिंग-नाईक यांनी केले.
शुक्रवारी बोरिवलीच्या शेठ गोपाळजी हेमराज हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालयातील ऑसिड अॅटॅकविषयक जागरूकता’या विषयावर संवाद साधताना त्या बोलत होत्या. ‘अॅसिडअॅटॅक’ बाबत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील भावना-शंका व्यक़्त कराव्यात, यासाठी हा उपक्रम आयोजित केला’ असे मत महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला झारे यांनी व्यक्त केले.



























































