आलिया भट कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत सांगितले आहे.

aalia-bhat

फेब्रुवारी महिन्यात ब्रम्हास्त्रच्या सेटवर रणबीर कपूर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आलियाच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी देखील पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आलियाने देखील टेस्ट केली होती. मात्र तिची टेस्ट निगेटीव्ह आलेली.

गेल्या काही दिवसात अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आमीर खान, मिलिंद सोमण, आर. माधवन वरुण धवन, मनोज बाजपेयी, सतीश कौशिक, रणबीर कपूर यांचा समावेश आहे.