छत्रपती चिडे हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक

35

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

अवैध दारू तस्करांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पीएसआय छत्रपती चिडे प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणातील 11 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. झारखंड-छत्तीसगड सीमेवरील गावातून पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांची पाच पथकं राज्यभरात आणि राज्याबाहेरही शोध घेत होती. प्रमुख मार्गांवरच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं. चिडे यांना चिरडणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकासह सहा आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. 7 नोव्हेंबर रोजी छत्रपती चिडे हे अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यांना स्कॉर्पिओने धडक दिली होती. त्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांनी काही दिवसांतच आपल्या उत्कृष्ट कामगिरीची चमक दाखवली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला होता. याची दखल पोलीस विभागाने घेतली. नुकताच त्यांना उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून गौरवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या