
गटार तुटले, ते तुंबले आणि गटार भरून वाहून परिसरात दुर्गंधी पसरत असेल तर त्यावर ताबडतोब कार्यवाही करून गटारांसंबंधीची सर्व प्रकारची दुरुस्ती 12 तासांच्या आत केली जाणार आहे. त्यासाठी पंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहे. पात्र पंत्राटदाराला दोन वर्षांसाठी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात असे एकूण 30 कोटींचे पंत्राट देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने दिली.
मुंबई शहर व दोन्ही उपनगरात मिळून एक लाखाहून अधिक गटारे आहेत. मुंबईतील पर्जन्य जलवाहिनी या ब्रिटिशकालीन असून त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे काही वेळा ही गटारे तुटतात, त्यातील घाण रस्त्यावर येते. अशा वेळी मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच अशा उघडय़ा गटारात पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर गटार तुटले किंवा तुंबल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळताच त्याची 12 तासांत दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी पंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी निविदा मागवल्या असून पात्र पंत्राटदाराला 2023-24 या दोन वर्षांसाठी पंत्राट दिले जाणार आहे.
एकूण एक लाख गटारे
पर्जन्य जलवाहिन्या विभाग
एकूण गटारे ः 25 हजार
मलनिस्सारण विभाग
शहर …………………………. 27 हजार 78
पश्चिम उपनगर …………… 31 हजार 621
पूर्व उपनगर ……………….. 15 हजार 983
एकूण ………………… 74 हजार 682



























































