पाकिस्तानच्या विकासाची जबाबदारी अल्लाहची, अर्थमंत्री इशक दार यांचे अजब विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानवर आर्थिक संकट ओढवले असून त्यावरून सध्या स्थानिक पातळीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री इशक दार यांनी अजब तर्कट मांडले आहे. आपले सरकार विकासासाठी सर्व प्रयत्न करत आहे. मात्र यातून मार्ग काढण्याची जबाबदारी अल्लाहची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटाविषयी अर्थमंत्री इशक दार म्हणाले, ‘पाकिस्तान देश जगात अनादीकाळापर्यंत अस्तित्वात राहण्यासाठी अल्लाहने निर्माण केला आहे. जगभरात हा एकमेव देश आहे की ज्याची निर्मिती इस्लामच्या नावे झाली आहे. पाकिस्तानचे संरक्षण, विकास आणि समृद्धीची जबाबदारी अल्लाहचीच आहे.’ आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागतोय, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.