
सामना ऑनलाईन, मुंबई
पद्मश्री पुरस्कार सन्मानित अलेक पदमसी यांचे निधन झाले, ते ९० वर्षांचे होते. रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात मोहम्मद अली जिना यांची भूमिका साकारणारे पदमसी हे विख्यात जाहिराततज्ज्ञ देखील होते. त्यांनी तयार केलेल्या हमारा बजाज, एमआरएफचा पीळदार माणूस, सर्फ,लिरील या जाहिरात संकल्पना प्रचंड गाजल्या होत्या.
लिंटास या प्रसिद्ध जाहिरात तयार करणाऱ्या कंपनीचे पदमसी हे जवळपास १४ वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले होते. जवळपास १०० कंपन्यांचे ब्रँड तयार करण्यात आणि ते मोठे करण्यात पदमसी यांचा वाटा होता.






























































