
मुलांना वाचनाचा अनुभव देण्यासाठी अॅमेझॉनने किंडल अॅप आहे. मात्र पुस्तकं वाचायच्या या किंडलवर पॉर्नोग्राफिक साहित्य दिसत असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर अॅपल आणि गुगलने अॅमोझॉनवर नाराजी व्यक्त करत अश्लिल साहित्य तत्काळ हटवण्याचा इशारा दिला आहे.
रॉयटर्सने पॉर्नोग्राफीक मजकूराबाबत तीन कंपन्यांशी संपर्क साधला असता गुगल आणि अॅपल कंपनीने ही कारवाई केली. या पोर्नोग्राफीक मजकूराच्या शिर्षकामध्ये “75 हॉट फुली न्यूड फोटोज ऑफ अ यंग ब्लॉंड ” आणि “रिअल इरोटिका: अॅमॅच्योर नेकेड गर्ल्स – व्हॉल्यूम 4” असे मजकूर होते. रॉयटर्सच्या अहवालानुसार, दोन पालकांनी संपर्क साधून त्यांच्या अल्पवयीन मुलांनी अश्लिल कंटेन्ट डाऊनलोड केला आहे. त्यांच्या या तक्रारीवर अॅमेझ़ॉनने रॉयटर्सला उत्तर देताना म्हंटले आहे की, ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित शॉपिंग आणि वाचनाचा अनुभव देण्याबाबत आम्ही कायम दक्ष असतो मात्र ही गंभीर गोष्ट असून आम्ही त्याचा तपास करतोय. आम्ही तो मजकूर तपासून यावर योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन अॅ मेझॉनने दिले आहे. तर याबाबत गुगल आणि अॅपलने इशारा देत अॅमेझॉनला मजकूर तत्काळ हटविण्यास सांगितले आहे. यामध्ये अॅप स्टोअरच्या नियमानुसार, कोणताही आक्षेपार्ह मजकूरा बंदी आहे. तसेच असे आढळल्यास त्याला सर्वस्वी अॅप डेव्हलपर जबाबदार धरण्यात येईल आणि काही चूकीचे आढळल्यास डेव्हलपरवर तत्काळ कारवाई करण्यात येईल
गुगल आणि अॅपल स्टोअरवरून किंडल आणि अॅमेझॉन अॅप डाऊनलोड केले जाते. लहान मुलांना अश्लिल मजकूर पाहिला जाऊ नये याबाबत कंपनींचे नियम असतात. आपल्या अॅप आणि वेबसाईटवर येणाऱ्या मजकूरासाठी कंपनी जबाबदार असते आणि तो मजकूर सर्वांसाठी पाहण्याजोगा, वाचण्याजोगा असेल. तंत्रज्ञान तेव्हाच चांगले होऊ शकते त्याने लोकांच्य़ा भावना दुखावल्या जाणाप नाहीत.




























































