आता अॅमेझॉनवर पाहता येणार न्यूझीलंडमधील क्रिकेट लढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ व न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार आता 2025-26 सालापर्यंत न्यूझीलंडमधील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतींचे थेट प्रक्षेपण आता अॅमेझॉन ‘प्राईव्ह व्हिडीओ’वर पाहता येणार आहे. याप्रसंगी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे संचालक गौरव गांधी म्हणाले, क्रिकेट हा हिंदुस्थानातील जनतेचा आवडता खेळ आहे. या खेळाशी आम्ही जोडले गेलो आहोत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचेही आम्हाला सहकार्य लाभले आहे. आमच्या प्राईम सदस्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे, असेही ते पुढे म्हणाले.