अंबरनाथच्या रस्त्यावर बेफिकिरीचे कारंजे, जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

546

दुरुस्ती आणि देखभालीकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे आज सकाळी अंबरनाथमध्ये जलवाहिनीला मोठे भगदाड पडले. तब्बल तीस फूट पाण्याचे कारंजे उडत होते. जीवन प्राधिकरणाच्या या बेफिकिरीने आधीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना या घटनेने हजारो लीटर पाणी वाया गेले. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण-बदलापूर महामार्गाकर बुकापाडा येथे सकाळी साडेसहा काजता ही पाइपलाइन फुटली. पाण्याचा प्रेशर जास्त असल्याने तब्बल 30 फूट कर पाण्याचे कारंजे उडत होते. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून अंबरनाथ शहर, ऑर्डनन्स फॅक्टरी, उल्हासनगर या शहरांना पाणीपुरकठा करणाऱया पाइपलाइन महामार्गाला लागून जात असून काही ठिकाणी रस्त्याचे मोठय़ा प्रमाणात कामही सुरू आहेत. दरम्यान जीवन प्राधिकरणाकडून पाण्याची पाइपलाइन दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांमध्ये दुर्लक्ष करत असल्याने जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या