
पाश्चिमात्य देशांमध्ये पॉप-रॉक संगीताचा मोठा चाहतावर्ग आहे. महागडी तिकीटं काढून तिथले संगीतप्रेमी लाईव्ह शोला हजेरी लावतात. तिथल्या संगीताच्या तालावर ताल धरतात. अशाच एका प्रसिद्ध लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एक किळसवाणा प्रकार घडला आहे.
या बँडचं नाव ब्रास अगेन्स्ट असं आहे. हा न्यूयॉर्क शहरातील एक प्रसिद्ध पॉप बँड आहे. या बँडचा एक लाईव्ह कॉन्सर्ट शो 11 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. तिथे एक भयंकर किळसवाणी घटना घडली.
हा कॉन्सर्ट ऐन भरात असताना या बँडची गायिका सोफिया उरिस्ता हिने एका चाहत्याला स्टेजवर बोलवलं. त्याला स्टेजवरच खाली झोपायला सांगितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर लघवी केली.
या धक्कादायक प्रकाराचं चित्रीकरण व्हायरल झालं आणि सोफियावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. अखेर सोफियाने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर माफी मागितली. ती म्हणाली की, मी जो स्टंट केला तो योग्य नव्हता. लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं ती म्हणाली आहे.
बँडनेही या झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ब्रास अगेन्स्टने त्यांच्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे की, सोफिया उरिस्ता खूपच उत्साहित झाली होती. या प्रकाराची आम्हाला बिलकुल अपेक्षा नव्हती आणि पुन्हा तुम्ही आमच्या शोमध्ये असं काहीही पाहणार नाही,



























































