24 तासांत अमेठी, रायबरेलीत उमेदवार

उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीत येत्या 24 तासांत उमेदवार देणार अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. काँग्रेससाठी या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असून या जागेवर उमेदवार देण्यास काँग्रेस घाबरल्याचे म्हटले जात आहे, परंतु हे धादांत खोटे असून योग्य वेळ आल्यानंतर या दोन्ही मतदारसंघातून उमेदवार जाहीर करू, असे खरगे यांनी म्हटले आहे.