महानायक अमिताभ बच्चन यांनी केले विराटचे कौतुक

501

विराट कोहलीच्या नाबाद 94 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या टी-20 लढतीत वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या खेळीचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले. त्यांनी सोशल साइटवर ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटातील  डॉयलॉगद्वारे विराट कोहलीच्या खेळीचे अभिनंदन केले. त्यानंतर विराट कोहलीने अमिताभ बच्चन यांचे आभारही मानले. अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीचे अभिनंदन करताना म्हटले की, यार कितनी बार बोला मई तेरे को …  की विराट को मत छेड़, मत छेड़, मत छेड़… पन सुनताइच किधर है तुम… अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में… देख देख… वेस्ट इंडीज का चेहरा देख; कितना मारा उसको, कितना मारा!

आपली प्रतिक्रिया द्या