मीनाताईंची भूमिका खूप आव्हानात्मक होती

46

सामना प्रतिनिधी । मुंबई

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्याबद्दल कुठलाही व्हिडीओ नाही. त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. त्यांच्याबद्दल कुठेही काहीही लिहूनही ठेवलेले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक होते. त्यांच्याबद्दल खूप शोधाशोध केल्यानंतर बाळासाहेबांची धाकटी बहीण संजीवनी करंदीकर यांची मुलाखत हाती लागली. मीनाताई या सून, पत्नी, आई म्हणून कशा होत्या हे त्या मुलाखतीतून मिळाले. त्याच्या आधारावर मी त्यांची भूमिका साकारली. अशी भावना माँसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता राव हिने व्यक्त केले.

महिनाभर मी आपल्यातच नव्हतो
‘ठाकरे’ या गाण्याची जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा प्रचंड तणावात होतो. महिनाभर मी आपल्यातच नव्हतो. सूर, ताल, लय आणि शब्द हे जेव्हा एकत्र आले, एकमेकांत मिसळले तेव्हा एक दमदार गाणे तयार झाले. हळूहळू सर्व काही सोपे होत गेले. खूप मजा आली.- नकाश अझीझ

वर्षभर फक्त ‘ठाकरे’च्याच गाण्याचा विचार केला
सिनेमाला संगीत देण्याची जबाबदारी जेव्हा आमच्यावर आली तेव्हा आम्ही वर्षभर फक्त ‘ठाकरे’ सिनेमातील गाण्याचाच विचार केला. बाळासाहेब हे आमच्यासाठी दैवतासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चित्रित केलेले गाणे कसे दमदार असले पाहिजे तसेच संगीत आम्ही दिले, असे संगीतकार रोहन-रोहन म्हणाले.

‘ठाकरे’चे गाणे मुंगीनेही तितक्याच जोशाने गायले असते
‘ठाकरे’ सिनेमातील मराठी गाणेही तितकेच जोमदार झाले आहे. हे गाणे एखाद्या मुंगीने गायले असते तरीही ते जोशपूर्णच गायले असते, अशी भावना मराठी गाण्याचे गायक अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या