खलिस्तानी अमृतपाल लोकसभा लढवणार

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग हा लोकसभा लढविणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये अमृतपालने पंजाबच्या अजनाला पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला केला होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. अमृतपाल सध्या दिब्रुगढ तुरुंगात आहे. तो खडूर साहिब येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे.