अमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अमृतसर

पंजाब मधील अमृतसर येथे निरंकारी भवनात झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भटींडा येथून 2 संशयितांना अटक केली आहे. हल्ल्यानंतर स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने संयुक्तपणे शोध माहिम सुरू केली आहे. याअंतर्गत या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी अमृतसरपासून 15 किलोमीटर अंतरावरील आदिलवाल गावात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यात 3 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे खलिस्तानी समर्थकांबरोबर आयएसआयचा हात असल्याचे समोर आले होते. पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी आयएसआयने कश्मीरमधील दहशतवाद्यांबरोबर हात मिळवणी केली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांनांही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय मदत करत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने संयुक्तपणे शोध मोहिम सुरू केली आहे.