ब्राह्मण असल्याचा आम्हाला गर्व! अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर नेटकरी संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व आहे, असे वक्तव्य करणाऱया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर नेटकरी प्रचंड संतापले आहेत. अमृता यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी जणू ‘गर्व से कहो हम ब्राह्मण है’ अशीच हाक दिली. आम्ही बुद्धिजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचाही गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचे मार्केटिंग करता येत नाही. अर्थात ही आमच्यातील कमतरता नव्हे; पण आम्ही असे करत नाही, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

मार्पेटिंग न करता येणे ही आमची महानता असून त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना न मागता मुख्यमंत्री केले. त्यांनी कधीच हे पद मागितलेले नाही हे सांगण्यासही अमृता फडणवीस विसरल्या नाहीत. मात्र त्यांच्या या भाषणानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.