
अमूलने आपल्या दुधाच्या विक्री दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाच्या खरेदी दराबरोबरच पाऊच पॅकिंगच्या खर्चात वाढ झाल्याने अमूलने दरवाढ केली असून नवे दर तत्काळ लागू केले आहेत. त्यामुळे महागाईने आधीच पिचलेल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दुधाच्या दरात सरसकट तीन रुपयांची वाढ झाल्याने अमूल गोल्डसाठी प्रतिलिटरला 66 रुपये मोजावे लागणार आहेत.
अमूल ताजासाठी 54 रुपये तर गाईच्या दुधाचा दर 56 रुपये झाला असल्याचे अमूल मिल्क फेडरेशनने स्पष्ट केले आहे. अमूलने याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये प्रतिलिटर दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली होती.

























































