गर्लफ्रेंडसाठी चिडवल्याने हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्लफ्रेंड नाही, असे चिडवल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना गुजरातमधील वडोदरा येथे घडली. हत्या करणारा आरोपी अल्पवयीन आहे. दिशांत राजपूतची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी पळाले. त्यानंतर बारावीच्या परीक्षेला गेले. हत्या करणाऱया दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रिमांडमध्ये रवानगी केली. दिशांत आणि हत्या करणारा मुलगा दोघेही टय़ूशनमध्ये सोबत होते. दिशांत त्याला गर्लफ्रेंड नाही म्हणून चिडवत होता. हाच राग मनात धरून आरोपी मुलाने दिशांतची हत्या केली.