
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत नागरिकता सुधारणा विधेयक सादर केले. त्यानंतर राज्यसभेत विधेयकावर वादळी चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधींचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आपल्या धर्मात आपण पुनर्जन्म मानतो. जर कधी सरदार पटेल मोदींना भेटले तर ते खूप नाराज होतील. महात्मा गांधींना तर प्रचंड दुःख होईल. माझी 150 वे जयंतीवर्ष साजरे करत असताना तुम्ही अशी कामे करत आहात, असे ते म्हणतील, असे शर्मा म्हणाले. महात्मा गांधींचा चष्मा आणि त्यांचे नाव फक्त जाहिरातीसाठी नाही. महात्माजींच्या चष्मातून देश बघा. समाज आणि मानवता बघा, असे शर्मा यांनी सांगितले.
Anand Sharma,Congress in Rajya Sabha: In our religion, we believe in rebirth,and that we meet our elders. So if Sardar Patel meets Modi ji then he will be very angry with him, Gandhi ji will ofcourse be sad, but Patel will be indeed very angry. #CitizenshipAmendmentBill pic.twitter.com/cTcnyynaet
— ANI (@ANI) December 11, 2019
पूर्ण देशभरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एनआरसीबाबत चर्चा होत आहे. काही ठिकाणी जमीनी विकत घेण्यात आल्या आहेत. तिथे डिटेंशन सेंटर उभारत आहेत, यामुळे जर्मनीतील नाझींच्या छळछावणीची आठवण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. आसाममध्ये मुलेही रस्त्यांवर उतरली आहेत. डिटेंशन सेंटर बनवलेल्या ठिकाणी सर्व पक्षांचे प्रतिनिधीमंडळ पाठवले पाहिजे. कोणत्याही एका पक्षाचे घोषणापत्र देशाचे संविधान असू शकत नाही. आसाम आज असंतोषाने धुमसत आहे. त्यांच्या मनात असुरक्षेची भावना असताना नागरिकता सुधारणा विधेयक आणले जात आहे. सरदार पटेल आणि महात्मा गांधींचे नाव घेऊन काहीही साध्य होणार नाही. आपण पुनर्जन्म मानतो. जर सरदार पटेल मोदींना भेटले तर खूप नाराज होतील. महात्मा गांधींचा चष्मा फक्त जाहिरातींसाठी नाही. त्या चष्मातून देश, समाज आणि मानवता बघा.
आतापर्यंत 9 सुधारणा विधेयके आली. गोवा, दमण-दीव, पद्दुचेरी, युगांडा, श्रीलंका, केनिया आलेल्या शरणार्थिंना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले. नागरिकत्व देताना संसदेने धर्माचा निकष ठेवला नव्हता. हे विधेयक कलम 14 चे उल्लंघन आहे. अटल बिहारी वाजपेयी सहा वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार का असा सवाल शर्मा यांनी केला. हे विधयक संविधानाच्या कसोटीत अपयशी ठरले आहे. हिंदुस्थानने अनेक शतके निर्वासीतांना शरण दिली आहे. ख्रिश्चन, पारसी, ज्यू सर्व धर्माच्या लोकांना हिंदुस्थानने शरण दिली आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना शरण देणारा आपला देश आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

























































