
डिसेंबर महिन्यात अॅण्ड पिक्चर्स वाहिनीवर विनोदी चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. 3 डिसेंबरपासून दर शनिवार- रविवारी सकाळी 11 वाजता ‘किंग्ज ऑफ कॉमेडी’ मध्ये चित्रपट दाखवले जात आहेत. यात गुड न्यूज, कूली नं. 1, मैं तेरा हिरो, धमाल, भागम भाग, फटा पोस्टर निकला हिरो, एंटरटेन्मेंट, हॅप्पी न्यू इयर यांसारखे अनेक धमाल विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहेत. विनोदाचे बादशहा आपल्या लोकप्रिय व्यक्तिरेखांद्वारे आणि ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.





























































