आंध्र प्रदेशात 21 दिवसात होणार बलात्काऱ्यांना शिक्षा

666

आंध्र प्रदेशात बलात्काराच्या आरोपींना त्वरित शिक्षा देण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला सुरक्षा विधेयकाच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली.

या विधेयकात बलात्कार प्रकरणी 21 दिवसांत सुनावणी पूर्ण करून आरोपींना शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश फौजदारी संशोधन कायदा 2019 (आंध्र प्रदेश दिशा कायदा) हे विधेयक लवकरच विधानसभेत मांडण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सोमवारी सांगितलं की, त्यांचे सरकार नवीन कायदा आणून हे सुनिश्चित करेल की बलात्कार प्रकरणाची सुनावणीत 21 दिवसात पूर्ण होऊन आरोपींना त्वरित शिक्षा सुनावली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या