
सामना ऑनलाईन, मेलबर्न
ग्रेटब्रिटनचा माजी नंबर वन टेनिसपटू अॅण्डी मरेचा शेवट कडू झाला. आपली अखेरची टेनिस स्पर्धा खेळणाऱ्या अॅण्डी मरेला ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत स्पेनच्या रोबर्टो बोटिस्टा अॅग्युट याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. पाच सेटच्या थरारक झुंजीनंतर अॅण्डी मरेला निराशेचा सामना करावा लागला. टेनिसला अलविदा करताना त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.
अॅण्डी मरे व रोबर्टो अॅग्युट यांच्यामध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. दोघांमधील लढत तब्बल 4 तास 9 मिनिटे रंगली. रोबर्टो अॅग्युट याने पहिले दोन सेट 6-4, 6-4 अशा फरकाने जिंकत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. मात्र त्यानंतर पुढील दोन सेटमध्ये अॅण्डी मरेने झोकात पुनरागमन करताना 7-6, 7-6 अशा फरकाने बाजी मारली. अखेरच्या सेटमध्ये अॅण्डी मरेला 2-6 अशा फरकने पराभूत व्हावे लागले.



























































