
महाराष्ट्रात फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारपासून बेपत्ता असलेले दोन आमदार मुंबईत परतले आहेत. मात्र त्यांचं मुंबईत परतणं सोपं नव्हतं. त्यांनी कशाप्रकारे स्वत:ची सुटका करून घेतली याचा थरारही त्यांनी यावेळी सांगितला.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काही आमदार संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच आहोत असं सांगून परतले. मात्र काही आमदार सोमवार सकाळपर्यंत बेपत्ता होते. अखेर सोमवारी सकाळी दौलत दरोडा आणि अनिल पाटील हे मुंबईत परतले. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी आपली सुटका कशी झाली हे सांगितले.
‘अजित पवार हे गटनेते जाहीर झाले होते. त्यांचाच फोन आल्याने हा पक्षाचा म्हणजेच शरद पवार यांचा आदेश असे सांगण्यात आले. शिवसेना-काँग्रेससोबतची बोलणी फिसकटल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आणि राष्ट्रवादी-भाजप असे मिळून हे सरकार स्थापन होत आहे, असं म्हणून आम्हाला राजभवानावर बोलवण्यात आलं’, असं या बेपत्ता आमदारांनी सांगितले.
Anil Patil, NCP MLA who was reportedly missing & brought to Mumbai from Delhi by NCP leaders today: We told Sharad Pawar sa’ab that we want to return & stay with the party, he assured us that we will be brought back and made the necessary arrangements. (2/2) #Maharashtra https://t.co/JZfdhzSKoG
— ANI (@ANI) November 25, 2019
अनिल पाटील म्हणाले की, आम्ही दिल्लीला एका हॉटेलमध्ये पोहोचलो. तेव्हा तिथे भाजपचे 100-200 कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच पोलिसांच्या असंख्य गाड्या आणि साध्यावेशात पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आम्ही घाबरून गेलो होतो. महाराष्ट्रात काय घडलं ते आम्हाला नंतर कळालं. आम्ही शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आम्ही आपल्यासोबत असून आम्हाला मुंबईत परत यायचं आहे, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र तिथून बाहेर पडणं कठीण होतं. अखेर चिंता करू नका तिथून तुमच्या बाहेर पडण्याची व्यवस्था होईल, असं आश्वासन आम्हाला मिळालं आणि त्यांच्यामुळेच आम्ही मुंबईत परतलो, असं ही पाटील म्हणाले. आम्ही पक्ष आणि शरद पवार यांना सोडून गेलोच नव्हतो. त्यांच्याशी संपर्कात होतो. आताही शरद पवार यांच्यासोबतच आहोत आणि राहणार, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.




























































