‘निर्भया’च्या न्यायासाठी अण्णांचे आंदोलन, 20 डिसेंबरपासून मौनव्रत

294

दिल्लीतील ‘निर्भया’ला त्वरित न्याय द्यावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या 20 डिसेंबरपासून अण्णा हजारे हे मौनव्रत धारण करणार असून त्यानंतरही कार्यवाही झाली नाही तर बेमुदत उपोषण करणार आहेत.

अण्णा हजारे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय कायदा मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बलात्कार व हत्या प्रकरणातील एका आरोपीला 14 ऑगस्ट 2005 रोजी बंगालमध्ये फाशी दिली गेली. त्यानंतर अशा प्रकरणातील कोणत्याही आरोपींच्या फाशीवर अंमलबजावणी झालेली नाही. आतापर्यंत देशात 426 गुन्हेगारांना फाशी सुनावण्यात आली आहे, पण एकालाही फाशी देण्यात आली नाही अशी माहिती अण्णा हजारे यांनी या पत्रात दिली आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून असा न्याय मिळण्यात उशीर होत असल्यानेच संतप्त जनतेने हैदराबाद प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरचे स्वागत केले असेही त्यांनी नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या