
सामना प्रतिनिधी । नगर
लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही मान न राखणाऱया मोदी सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
अण्णांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले असून या पत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकपाल आणि लोकायुक्त हा कायदा लोकसभा व राज्यसभा या संवैधानिक संस्थांनी बनविलेला आहे. लोकपाल नियुक्त करून संसदेने तयार केलेल्या कायद्याचे पालन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकार लोकपाल व लोकायुक्त कायद्याचे पालन करत नाही. संसदेने पारीत केलेल्या या कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानेही बऱयाच वेळा फटकारले आहे. त्यामुळे हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचादेखील मान ठेवत नाही, अशा शब्दांत अण्णांनी निशाणा साधला.
































































