
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानचा एक ड्रोन पुन्हा हिंदुस्थानच्या हद्दीत घिरट्या घालत होता. हिंदुस्थानने हा ड्रोन पाडले आहे. हा पाकिस्तानचा दुसरा ड्रोन आहे जो हिंदुस्थानने पाडला आहे. पंजाबच्या फाजिल्का भागात बीएसफच्या जवानांनी हा ड्रोन पाडला आहे. हा ड्रोन विशिष्ट लक्ष्यावर लेजर गाईडेड बॉम्बने हल्ला करतो. हिंदुस्थानने अँटी एअरक्राफ्टच्या मदतीने हा ड्रोन पाडाला आहे.
ड्रोन पाठवण्याची पाकिस्तानची ही पहिली वेळ नाही. या पूर्वी सोमवारी राजस्थानमधील बीकानेरमध्ये असेच एक पाकिस्तानी ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीत घिरट्या घालत होते. तेव्हा हिंदुस्थानी हवाई दलानेहे ड्रोन पाडून टाकले. तर गेल्या आठवड्यात शनिवारी राजस्थानच्याच श्रीगंगा नगरमध्ये एक ड्रोन दिसले. तेव्हाही हिंदुस्थानी सैन्याने गोळ्या घालून त्या ड्रोनला पिटाळून लावले. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खा यांनी जरी शांततेचे आवाहन केले असले तरी पाकिस्तानच्या सैन्याकडून कुरापती सुरूच आहेत.

























































